मोटरसायकल चोरी करणारा इसम १२ तासांत एम.आय.डी.सी. पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव(प्रतिनिधी):दि. ०४ एप्रिल – एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अवघ्या १२ तासांच्या आत अटक करण्यात आली आहे.

दिनांक ०३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९.०० वाजेच्या सुमारास फिर्यादी अरुण सखाराम अहीरे (वय ३८, व्यवसाय मजुरी, रा. तांबापुरा) हे आपल्या गॅरेजवरून घरी आले. त्यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर (क्रमांक MH-28 G 3256) घरासमोर उभी करून हँडल लॉक केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी ०४ एप्रिल रोजी सकाळी ७.०० वाजता उठून पाहिले असता संबंधित मोटरसायकल जागेवर दिसून आली नाही.

फिर्यादी यांनी परिसरात शोध घेतला, परंतु गाडी न मिळाल्याने त्यांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक २५०/२०२६ बी.एन.एस. कलम ३०३(२) अंतर्गत नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जलद कारवाई करत अवघ्या १२ तासांत आरोपी साहील मोहम्मद तडवी (वय २८, रा. मच्छीबाजार, तांबापुरा, जळगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने मोटरसायकल चोरीची कबुली दिली.

पोलिसांनी चोरीस गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल (MH-28 G 3256) जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS