जळगावात निवृत्त नायब तहसीलदाराच्या घरात चोरी; पाण्याची मोटार व गॅस सिलिंडर लंपास

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात घरफोडीच्या घटना वाढत असून, आता चोरट्यांनी एका निवृत्त नायब तहसीलदाराचे घर लक्ष्य केले आहे. जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रद्धा हौसिंग सोसायटीत ही घटना घडली.

भिकमचंद नगर परिसरात राहणारे मनोहर सुकलाल ठाकरे (वय ७४) हे ४ मार्च ते १ एप्रिल दरम्यान बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा कापून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातून सुमारे ४,००० रुपये किमतीची ‘टेक्समो’ कंपनीची अर्धा अश्वशक्तीची पाण्याची मोटार आणि २,५०० रुपये किमतीचा भारत गॅस कंपनीचा भरलेला एलपीजी सिलिंडर, असा एकूण ६,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

ठाकरे हे घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी त्यांनी २ एप्रिल रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश भांडारकर करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS