ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई ३ कोटींच्या सोन्याच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी अटकेत

ठाणे (प्रतिनिधी)दि. ०१ एप्रिल २०२६

 शहरात सराफी व्यापारी व ग्राहकांची तब्बल ३ कोटी रुपयांच्या सोन्याची व १७.५० लाख रुपयांच्या रोख रकमेची फसवणूक करणाऱ्या आरोपीला अखेर गुन्हे शाखा, घटक-१, ठाणे यांनी अटक केली आहे.

🔍 काय आहे प्रकरण?

सन २०२५ मध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आरोपीने ठाणे व भिवंडी येथील सराफी व्यापाऱ्यांना “ए-वन क्वालिटीचे शुद्ध सोने” मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यामुळे व्यापाऱ्यांना मोठा नफा होईल असे सांगून त्यांची फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६५३/२०२५ (दि. २९/१०/२०२५) व याआधी गुन्हा क्रमांक ६४३/२०२५ (दि. १७/१०/२०२५) भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये नोंद करण्यात आले होते.

🚔 तपास व अटक

तपासादरम्यान आरोपी सतत आपले लोकेशन बदलत विविध राज्यांत फिरत असल्याने पोलिसांना चकवा देत होता. मात्र गोपनीय माहितीच्या आधारे तो घोडबंदर, ठाणे येथे येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचला.

दि. २३ मार्च २०२६ रोजी रात्री ८:२० वाजता आरोपीला अटक करण्यात आली.

👤 अटक आरोपी

जीवाराम वर्धाजी चौधरी (वय ४६ वर्षे)

राहणार: जांभळी नाका, ठाणे

मूळ गाव: ता. बाली, जि. पाली, राजस्थान

💰 जप्त केलेला मुद्देमाल

पोलिसांनी ठाणे व राजस्थान येथून खालील मालमत्ता हस्तगत केली आहे:

१,२१५.७९ ग्रॅम (५ लगडी) सोनं – किंमत ₹१,३९,९७,१७७

७४२ ग्रॅम (२ लगडी) सोनं – किंमत ₹९०,००,०००

₹१७,५०,००० रोख रक्कम

👮‍♂️ पोलिसांची कामगिरी

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

गुन्हे शाखा, घटक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS