जळगाव(प्रतिनिधी ): स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव तसेच भुसावळ शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
दि. 03 फेब्रुवारी 2026 रोजी भुसावळ शहरातील न्यायालय परिसरातून Hero Honda कंपनीची एच.एफ. डिलक्स (क्र. एमएच 39/टी 6102) ही मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी फिर्यादी अॅड. रोकडे यांच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 09/2026 भा.न्या.सं.क. 303(2) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बारबोट (भुसावळ विभाग), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड व भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. उद्धव डमाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी किरण उर्फ करण शालीग्राम पाटील (रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) याला चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
तपासात Honda कंपनीची शाईन (क्र. GJ 05/NA 6180) ही मोटारसायकल गुजरात राज्यातील Surat येथील अलथान पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. संबंधित गुन्हा रजिस्टर नं. 085/2026 भा.न्या.सं.क. 303(2) प्रमाणे दाखल आहे.
आरोपी हा सराईत मोटारसायकल चोर असून त्याच्याविरुद्ध मलकापूर, भुसावळ बाजारपेठ आदी पोलीस ठाण्यांत यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पो.हे.कॉ. उ. पाटील, पो.कॉ. प्रशांत परदेशी, पो.कॉ. राहुल वानखेडे तसेच भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. राहुल भंडारे, पो.कॉ. राहुल भोई आणि पो.ना. नितीन चौधरी यांनी केली.
संयुक्त तपास पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.









