जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात नागरिकांसाठी मोफत आरोग्य सेवेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. माहेर क्लिनिक यांच्या वतीने युनानी व पंचकर्म पद्धतीवर आधारित मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत आयोजित करण्यात आले असून, शिरसोली नाका, डी-मार्टसमोर, मच्छी बाजार रोड, तांबापुरा, जळगाव येथे हे शिबिर पार पडणार आहे.
या शिबिरात एम.डी. तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात येणार असून आवश्यक रक्त तपासणीवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. तसेच गरज भासल्यास मोफत औषधोपचार देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
सांधेदुखी, जुनी सर्दी-खोकला, वाढते वजन, मधुमेह (डायबेटीस), लिकोरिया (सफेद पाणी), मुळव्याध, त्वचारोग, पिवळा कावीळ, कंबरदुखी, मानदुखी, हात-पाय मुंग्या येणे तसेच विविध प्रकारच्या वेदनांवर थेरपीद्वारे उपचार केले जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
या शिबिरात डॉ. अकिल शेख (MD), डॉ. इशरत जहा (MD), डॉ. सुमैय्या शेख (BUMS) आणि डॉ. शोएब शेख (BUMS) हे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत.
परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









