जळगाव जिल्हा पोलीस दलाची विशेष वाहन चेकिंग मोहीम; ११०० हून अधिक वाहनांवर कारवाई, १३.७१ लाखांचा दंड वसूल

 जळगाव(प्रतिनिधी)

जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या ‘विशेष वाहन चेकिंग मोहिमे’ अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई करण्यात आली. 

 

या मोहिमेत ११०० हून अधिक वाहनांवर कारवाई करत तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 

ही विशेष मोहीम जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकाच वेळी राबविण्यात आली. परवाना नसणे, ट्रिपल सीट, हेल्मेट न वापरणे, सिग्नल उल्लंघन, कागदपत्रांची पूर्तता नसणे आदी कारणांवरून संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात आली.

 

अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहतूक नियमांची अंमलबजावणी प्रभावी करणे तसेच नागरिकांमध्ये नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.

 

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली असून, आगामी काळातही अशा प्रकारच्या विशेष तपास मोहिमा सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

 

 नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS