Home जळगांव संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे “हिंद दी चादर” उपक्रमांतर्गत चित्रकला व पोस्टर स्पर्धा उत्साहात

संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे “हिंद दी चादर” उपक्रमांतर्गत चित्रकला व पोस्टर स्पर्धा उत्साहात

0
संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे “हिंद दी चादर” उपक्रमांतर्गत चित्रकला व पोस्टर स्पर्धा उत्साहात

मेहरून, जळगाव ( प्रतिनिधी: इमरान खान)

मेहरून येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये “हिंद दी चादर” या उपक्रमांतर्गत चित्रकला व पोस्टर स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि देशभक्तीची भावना दृढ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी “राष्ट्रीय एकात्मता”, “सर्व धर्म समभाव”, “स्वच्छता व पर्यावरण संरक्षण” यांसारख्या सामाजिक भान जपणाऱ्या विषयांवर आकर्षक व आशयघन चित्रे आणि पोस्टर्स सादर केली. रंगांची प्रभावी मांडणी, कल्पक संकल्पना आणि स्पष्ट सामाजिक संदेश यामुळे परीक्षकांसमोर विजेते निवडणे आव्हानात्मक ठरले.

कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना चालना मिळते व सामाजिक जाणीव अधिक बळकट होते, असे मत व्यक्त केले.

स्पर्धेचे आयोजन व परीक्षण शिक्षकवृंदांच्या सहकार्याने करण्यात आले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.