विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय सज्ज; शाळा पूर्वतयारी अभियानास उत्साहात प्रारंभ

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी) : शहरातील रामेश्वर कॉलनी येथील रोजी आज नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शाळा पूर्वतयारी अभियानास उत्साहात प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत आनंददायी, प्रेरणादायी आणि शैक्षणिक वातावरणात व्हावे यासाठी विद्यालयात विविध पूर्वतयारीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

अभियानांतर्गत शाळा परिसराची स्वच्छता, वर्गखोल्यांची सजावट, शैक्षणिक साहित्याची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याच्या सुविधांची तपासणी तसेच विविध विभागांची पाहणी करण्यात आली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून संपूर्ण परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक बनविला.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सुरक्षित, स्वच्छ व आनंददायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी विद्यालय प्रशासन कटिबद्ध असल्याचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले. तसेच नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत आणि शैक्षणिक वर्षाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमामुळे विद्यालय नवीन शैक्षणिक वर्षासाठी पूर्णतः सज्ज झाले असून पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा पूर्वतयारी अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest