ओला कंपनीच्या ईलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी व MCU असेंबली चोरी करणारे चोरटे एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव (प्रतिनिधी: इम्रान खान)

जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथील ओला इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटरसमोरून ओला कंपनीच्या ईलेक्ट्रिक मोटारसायकलची बॅटरी व MCU असेंबली चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. सदर चोरी दि. 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7.00 वाजेपासून ते दि. 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या दरम्यान घडली होती.

या प्रकरणी फिर्यादी यांनी दि. 20 जानेवारी 2026 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 60/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकरणाची गंभीर दखल घेत मा. पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची विशेष टीम तयार करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोहेकॉ 911 गिरिष पाटील, पोकॉ 1012 निलेश पाटील, पोकॉ 1395 शशिकांत मराठे व पोकॉ 2496 रमाकांत साळुंखे यांचा समावेश होता.

गुन्हे शोध पथकाने घटनास्थळ तसेच जळगाव शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला असता, सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाले.

अटक करण्यात आलेले आरोपी:

अब्देअली शब्बीर नगरी (वय 28 वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. अरसिवाला कॉलनी, शिवाजीनगर, जळगाव)

साकीब खान इरफान खान सिकलगर (वय 22 वर्षे, व्यवसाय – मजुरी, रा. सालारनगर, जळगाव)

आरोपींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून एकूण 57,000 रुपये किंमतीची ओला कंपनीची ईलेक्ट्रिक मोटारसायकलची बॅटरी व MCU असेंबली हस्तगत करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ 911 गिरिष पाटील व पोकॉ 1012 निलेश पाटील हे करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS