गुरुजी’ चित्रपटातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा

जळगाव : (प्रतिनिधी) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील आज रोजी शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ‘गुरुजी’ हा शैक्षणिक चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन जिद्द, चिकाटी आणि अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळाली.

चित्रपटात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा संघर्षमय पण प्रेरणादायी शिक्षणप्रवास प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी हा चित्रपट उत्स्फूर्त प्रतिसाद देत पाहिला व त्यातील संदेश आत्मसात केला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक, पर्यवेक्षिका शितल कोळी तसेच कार्यक्रमाचे संयोजक दिप्तेश सुलक्षणे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत अशा उपक्रमांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

हा उपक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS