दुचाकी चोरट्यास जेरबंद; चोरीची हिरो स्प्लेंडर जप्त

जळगाव (प्रतिनिधी): शहरात वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रामानंद नगर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून एका सराईत दुचाकी चोरट्यास अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

खंडेराव नगर परिसरातील रहिवासी ज्ञानेश्वर उखा भोई यांनी आपली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एमएच १९ एएस ५२२४) घरासमोर उभी केली असता, अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली होती. या प्रकरणी दि. २५ रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले.

तपासादरम्यान पोलीस हवालदार सुशील चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की, पिंप्राळा हुडको परिसरात एक तरुण संशयास्पदरीत्या वावरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमीन शाह जहुर शाह (वय —, रा. न्यू दूध फेडरेशन, पिंप्राळा हुडको) याला ताब्यात घेतले.

सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र अधिक चौकशीदरम्यान त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, पोलीस हवालदार सुशील चौधरी व चालक पोलीस नाईक संदीप बिऱ्हाडे यांनी सहभाग घेतला.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS