स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांची कारवाई; चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त

जळगाव(प्रतिनिधी ): स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांनी चोरीची कबुली दिली आहे.

जामनेर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यांमधील दोन मोटारसायकली तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशन येथील एका गुन्ह्यातील मोटारसायकल अशी एकूण तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आरोपी नामे अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९, रा. वाकी रोड, हरिओम नगर, जामनेर) व दर्शन बाप्पू चव्हाण (वय १८, रा. संत सेवालाल नगर, जामनेर) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या एका साथीदाराच्या मदतीने या मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींचे तपशील पुढीलप्रमाणे —

जामनेर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १८/२०२६ व ३८/२०२६ (BNS 303(2)) अंतर्गत दोन मोटारसायकली तसेच भुसावळ शहर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १७७/२०२४ (BNS 303(2)) अंतर्गत एक मोटारसायकल.

जप्त केलेला मुद्देमाल व आरोपी पुढील कायदेशीर कारवाईसाठी जामनेर पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे, तसेच पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाडे, उमाकांत पाटील, पो.ना. विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी व राहुल वानखेडे यांच्या पथकाने केली.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS