जळगाव (प्रतिनिधी) दि. ७ एप्रिल २०२६ शहरातील रामेश्वर कॉलनी आज रोजी येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात “माजी विद्यार्थ्यांचा एक दिवस शाळेसाठी – डिजिटल शिक्षण मार्गदर्शन” हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थिनी कुमारी लीना संजय माळी हिने विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मोबाईल व इंटरनेटचा योग्य व सुरक्षित वापर कसा करावा, तसेच ऑनलाईन शिक्षणासाठी विविध साधनांचा प्रभावी वापर कसा करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रात्यक्षिक सत्रामध्ये YouTube, Google Search तसेच विविध शैक्षणिक ॲप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अनेक प्रश्न विचारले व त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले.
या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी मुकेश महाजन, चेतन सपकाळे, मयूर घोडेराव, कार्तिक चौधरी, गिरीश दांडगे आणि अंश जोहरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरला.







