जळगाव (प्रतिनिधी:सरिता महाजन) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पायोनियर कॉम्प्युटरचे मार्गदर्शक श्री. अतुल चांदेलकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसंदर्भात सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करावे, वेळेचे व्यवस्थापन कसे साधावे तसेच परीक्षेदरम्यान येणारा ताणतणाव कसा दूर करावा याबाबत त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
या कार्यक्रमास परिवेक्षिका शीतल कोळी व उपशिक्षिका साधना शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा देण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी मार्गदर्शक तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.









