(जळगाव :प्रतिनिधी)
नमस्कार,
मी सौ. अर्चना ललित कोळी.
प्रभाग क्र. १८ (क) अ.नु. ६ हा प्रभाग यंदा महिला आरक्षित (सर्वसाधारण) झाल्याने मी या प्रभागातून निवडणूक लढवत असून जनतेच्या सेवेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
माझे पती श्री. ललित कोळी यांनी २०१८ च्या निवडणुकीत काही मतांनी पराभव झाल्यानंतरही गेली आठ वर्षे सातत्याने प्रभागात सक्रिय राहून लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले आहे.
नगरसेवक नसतानाही त्यांनी प्रभागातील नागरीकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
आठ वर्षांत केलेली उल्लेखनीय कामगिरी
• प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत प्रभागातील गोरगरीब जनतेस २०० गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिली.
• आमदार निधीतून प्रभागात विविध ठिकाणी २२ एलईडी स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्या.
• कोरोना महामारीच्या काळात प्रभागातील गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.
• पाणीटंचाईच्या काळात स्वखर्चाने पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले.
• उस्मानिया मस्जिद मागील भागात सांडपाण्यामुळे निर्माण झालेला मोठा खड्डा स्वखर्चाने ४५ ट्रॅक्टर मुरुम टाकून भरून काढण्यात आला, त्यामुळे मुस्लिम बांधवांना नमाजासाठी ये-जा करणे सुलभ झाले व आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला.
• सुप्रीम कॉलनीत गटारीवरील ओट्यांमुळे साचणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर स्वखर्चाने उपाय करण्यात आला.
• जगवानी नगर येथील ओपन स्पेसमधील धोकादायक खड्डा मुरुम भरून बंद करून मुलांसाठी सुरक्षित खेळाचे मैदान तयार करण्यात आले.
• जगवानी नगर येथे गेली १५ वर्षे दबलेली गटार जेसीबीच्या सहाय्याने सुरळीत करण्यात आली.
• प्रभागात विविध ठिकाणी नागरिकांसाठी बसण्याचे बाक स्वखर्चाने उपलब्ध करून दिले.
• सुप्रीम कॉलनीत अमृत योजना व पाण्याची टाकी उभारणीसाठी मा. महापौर सौ. भारतीताई कैलास सोनवणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून यश मिळवले.
• प्रभागात रेशन दुकान सुरू व्हावे यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
• वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम नियमितपणे राबवण्यात आले.
निवडून आल्यावर विकासाचा अजेंडा
नागरिकांच्या आशीर्वादाने निवडून आल्यास पुढील विकास कामांना प्राधान्य दिले जाईल —
• पाच दिवसांनी होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्यासाठी प्रयत्न.
• रस्ते, ड्रेनेज, गटारी, स्ट्रीट लाईट सुधारणा.
• ओपन स्पेस विकसित करणे.
• ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याच्या सुविधा.
• युवकांसाठी व्यायामशाळा व वाचनालय.
• महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना.
गेल्या १५ वर्षांपासून प्रभागातील समस्यांमुळे नागरिकांना जो त्रास सहन करावा लागला आहे, त्या सर्व समस्यांचे कायमस्वरूपी निवारण करण्याचा मनापासून शब्द देत असल्याचे सौ. अर्चना ललित कोळी यांनी सांगितले.
“२०१८ मध्ये थोडक्यात पराभव झाला असला तरी विकासाची जिद्द कधीच कमी झाली नाही. सुप्रीम कॉलनी व संपूर्ण प्रभागाचा खऱ्या अर्थाने कायापालट करण्याची क्षमता आमच्यात आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









