जळगाव (प्रतिनिधी): शहरातील रामेश्वर कॉलनी येथील आज रोजीसंत ज्ञानेश्वर विद्यालयात उत्साहात कार्यक्रम संपन्नदि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी स्मरणार्थ “हिंद दी चादर” उपक्रमांतर्गत चांगल्या सवयींची शपथ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वच्छता, आदर आणि प्रेमभाव जपण्याची प्रतिज्ञा घेत सकारात्मक मूल्ये अंगीकारण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना स्वच्छ परिसर राखणे, पालक व शिक्षकांचा आदर करणे, सर्वांशी प्रेमाने वागणे तसेच “आपण सारे एक आहोत” हा संदेश कृतीतून दाखविण्याचे आवाहन करण्यात आले. लहानग्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शपथ घेतली आणि चांगल्या सवयी अंगीकारण्याचे वचन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिष्मा वंजारी यांनी प्रभावीपणे केले. मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









