मेहरूण (जळगाव) : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पातुर येथील कु. रेणुका दिनेश केकन हिने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून जिल्हाधिकारी पदासाठी निवड मिळवली आहे. तिच्या या यशाबद्दल लाडवंजारी युवा संघटना, मेहरूण यांच्या वतीने तिचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कु. रेणुका केकन हिला सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, उपस्थितांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास समाजातील पदाधिकारी, महिला मंडळ सदस्य, ज्येष्ठ नागरिक, विविध घटकांचे प्रतिनिधी तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आयोजन लाडवंजारी युवा संघटना, मेहरूण (जळगाव) यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना नाईक, सोनल लाडवंजारी, वैशाली लाडवंजारी, लता सानप, नीता लाडवंजारी, लता पाटील, मीना चाटे, वैशाली चाटे, शितल सानप, अनिता पाटील, जिजाबाई पाटील, मिराबाई पाटील आणि कविता लाडवंजारी यांनी विशेष परिश्रम घेतले.








