संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘चिमणी दिन’ उत्साहात साजरा; ‘माझं घर चिमणीचं घर’ उपक्रमाची विशेष दखल

  • जळगाव (जिल्हा प्रतिनिधी: इम्रान खान ) शहरातील रामेश्वर कॉलनी येथील आज रोजी ‘चिमणी दिना’निमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात विविध पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये चिमणी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
  • यावेळी ‘माझं घर – चिमणीचं घर’ हा अभिनव उपक्रम विशेष आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरात चिमण्यांसाठी पाण्याची भांडी ठेवली, दाणे टाकले तसेच काही विद्यार्थ्यांनी चिमण्यांसाठी घरटी तयार करून त्यांना सुरक्षित निवास उपलब्ध करून दिला.
  • यासोबतच जनजागृती उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. “चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा” हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवला.
  • या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबतची जाणीव अधिक दृढ झाली. कार्यक्रमादरम्यान रूपाली आव्हाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व स्पष्ट केले.
  • विद्यालयाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS