संत ज्ञानेश्वर विद्यालयात ग्राहक हक्क दिनानिमित्त “वस्तू ओळखा” उपक्रम

  • जळगाव (प्रतिनिधी): शहरातील रामेश्वर कॉलनी येथील आज रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन निमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी “वस्तू ओळखा” हा माहितीपूर्ण उपक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
  • या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध दैनंदिन वापराच्या वस्तू दाखवून त्या वस्तूंवरील MRP, उत्पादन तारीख, मुदत समाप्ती (Expiry Date), वजन आणि उत्पादक कंपनीचे नाव याची माहिती कशी तपासावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोणतीही वस्तू खरेदी करताना बिल घेणे, मुदत संपलेली वस्तू टाळणे आणि वस्तूवरील योग्य माहिती तपासणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
  • या उपक्रमावेळी पर्यवेक्षिका शितल कोळी मॅडम यांनी उपक्रमाचे निरीक्षण केले. तसेच रूपाली आव्हाड मॅडम यांनी विद्यार्थ्यांना उपक्रमाचे महत्त्व पटवून देत जागरूक ग्राहक बनण्याचे मार्गदर्शन केले.
  • विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्कांविषयी जागरूकता निर्माण होऊन ते भविष्यात जबाबदार नागरिक बनण्यास प्रेरित होतात, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS