मेहरुण येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ; विद्यालयाला इन्व्हर्टरची भेट

जळगाव (प्रतिनिधी):शहरातील रामेश्वर कॉलनी येथील : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास शिक्षकवृंद तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. काही विद्यार्थ्यांनी गीत सादर करून उपस्थितांना भावूक केले.

या प्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून विद्यालयाला इन्व्हर्टर भेट दिला. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. या भेटीमुळे विद्यालयाच्या सुविधांमध्ये भर पडणार असल्याचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत परिश्रम, शिस्त व जिद्दीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी मोठी घोषणा करत पुढील वर्षापासून दहावीचे शिक्षण मोफत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या घोषणेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून तरन्नुम मुस्ताक तडवी हिला गौरविण्यात आले. कार्यक्रमास संचालक अर्चना नाईक, भागवत सानप, युवराज सानप, जितेंद्र नाईक, एकनाथ वाघ, पर्यवेक्षिका शितल कोळी, पर्यवेक्षक निलेश पवार यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कविता सानप यांनी तर आभार प्रदर्शन रूपाली आव्हाड यांनी केले.

हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांसाठी भावनिक, संस्मरणीय व प्रेरणादायी ठरला.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS