१ कोटी १० लाखांचे दोन हायवा डंपर चोरी प्रकरण उघड राजस्थान–हरियाणा येथील आंतरराज्यीय टोळी जेरबंद; ४ आरोपी अटकेत

शिरपूर (प्रतिनिधी) : दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री शिरपूर शहरातील दोन हायवा डंपर चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डि.बी. पथकाने अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याचा छडा लावत आंतरराज्यीय टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत राजस्थान व हरियाणा येथील ४ आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेली दोन्ही वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.

🚛 चोरीची घटना

तक्रारदार

प्रदीप लक्ष्मण चौधरी (रा. मिलिंदनगर, शिरपूर)

अमन अश्विन कटारिया (रा. मारवाडी गल्ली, शिरपूर)

यांचे टाटा कंपनीचे सिगना मॉडेलचे पांढऱ्या रंगाचे दोन मालवाहतूक हायवा डंपर (क्र. MH-18 BZ 5114 व MH-18 BH 1718) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.

🔍 तपासाची दिशा

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी विशेष पथक तयार केले. पथकाने शिरपूरपासून मध्यप्रदेश व राजस्थानातील भिलवाडा दरम्यान शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. टोल नाके, तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आले.

👮 अटक आरोपी

इरफान उस्मान मेव (वय 40, रा. नूह, हरियाणा)

नियामत दिनू मेव (वय 34, रा. पलवल, हरियाणा)

कालू गुफुरखा मेव (वय 50, रा. भिलवाडा, राजस्थान)

महावीर प्रसाद भवनलाल शर्मा (वय 50, रा. भिलवाडा, राजस्थान)

राजस्थान राज्यातील पोलिसांचे सहकार्य लाभले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले दोन्ही हायवा डंपर तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली मारुती सुझुकी बलेनो कार (क्र. HR 52 G 7875) जप्त करण्यात आली आहे.

💰 जप्त मालमत्ता

टाटा सिगना 2380 हायवा डंपर – ₹47,00,000

टाटा सिगना 3532 हायवा डंपर – ₹53,00,000

मारुती सुझुकी बलेनो कार – ₹10,00,000

👉 एकूण किंमत: ₹1,10,00,000 (एक कोटी दहा लाख रुपये)

⚖️ न्यायालयीन कारवाई

सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पो. हवा. रविंद्र आखडमल करीत आहेत.

👏 वरिष्ठांचे मार्गदर्शन

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शिरपूर पोलिसांच्या या धाडसी व तत्पर कारवाईमुळे आंतरराज्यीय वाहनचोरी टोळीचा पर्दाफाश झाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS