सर्जनशीलतेचा जल्लोष! चिमुकल्यांनी उभारले शिवरायांचे भव्य किल्ले

जळगाव (प्रतिनिधी): शहरातील रामेश्वर कॉलनी येथील आज रोजी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक आणि भव्य किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार घडवला.

कार्डबोर्ड तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या विविध साहित्याच्या साहाय्याने चिमुकल्यांनी कल्पकतेने किल्ले उभारले. बुरूज, तटबंदी, दरवाजे आणि भगवे ध्वज यांची बारकाईने मांडणी करत विद्यार्थ्यांनी शिवकालीन वैभव जिवंत केले. लहान वयातही त्यांनी दाखवलेली कल्पकता आणि मेहनत उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

या उपक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक मुकेश नाईक आणि पर्यवेक्षक निलेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयीची आवड, देशभक्तीची भावना आणि सर्जनशीलतेचा विकास घडून आला.

कार्यक्रमामुळे शाळेचा परिसर देशभक्तीच्या आणि आनंदाच्या वातावरणाने भारावून गेला. पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. 🚩

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS