अश्लील व्हिडिओच्या रागातून तरुणाची हत्या; पती-पत्नी अटकेत

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरसाडे तांडा येथे एका २६ वर्षीय तरुणाची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय भिमा राठोड (वय २६, रा. वरसाडे तांडा) हा तरुण २४ फेब्रुवारी २०२६ पासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतरही त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. दरम्यान १३ मार्च रोजी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून विजयची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.

तपासादरम्यान असे समोर आले की, विजयने आरोपी महिला सोनाली संजय जाधव हिच्यासोबतचे काही अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये तयार केले होते. या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने विजय राठोडचा खून केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी संजय परशुराम जाधव व सोनाली संजय जाधव (दोघे रा. वरसाडे तांडा नं. ०३, पाचोरा) यांना अटक केली आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विजयच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचेही तपासात समोर आले आहे.

याबाबत मयताचा भाऊ संजय भिमा राठोड (वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि कल्याणी वर्मा करीत असून उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS