विद्यार्थ्यांच्या हाती ‘प्रथमोपचाराची ताकद’; डॉ. जयश्री महाजन यांचे मार्गदर्शन

Spread the love

मेहरूण : (प्रतिनिधी):

विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी जीवनकौशल्ये आत्मसात व्हावीत आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान राखून योग्य प्राथमिक मदत करता यावी, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी डॉ. जयश्री ललित महाजन यांनी विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे महत्त्व समजावून सांगत प्रथमोपचार पेटीतील विविध साहित्याची प्रत्यक्ष ओळख करून दिली. त्यांचा उपयोग, तसेच अपघात, खेळताना दुखापत होणे, रक्तस्राव, भाजणे किंवा चक्कर येणे अशा प्रसंगी कोणती काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

 

आपत्कालीन प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे आणि आवश्यकतेनुसार शिक्षक, पालक किंवा वैद्यकीय तज्ज्ञांची तातडीने मदत घेणे गरजेचे असल्याचे डॉ. महाजन यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने प्रथमोपचार करण्याऐवजी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून योग्य मदत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

प्रशिक्षणादरम्यान प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. प्रथमोपचार पेटीतील साहित्य प्रत्यक्ष दाखवून त्याची माहिती देण्यात आली. विविध आपत्कालीन प्रसंगांवर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आल्याने त्यांचा उत्स्फूर्त सहभाग वाढला.

 

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी प्रथमोपचाराचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. संकटाच्या वेळी न घाबरता योग्य पद्धतीने मदत करण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा, यासाठी शाळेत कृतीआधारित व जीवनोपयोगी उपक्रमांना सातत्याने प्राधान्य दिले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रसंगावधान, आत्मविश्वास, आरोग्यविषयक जागरूकता, सुरक्षिततेची भावना आणि इतरांना मदत करण्याची सामाजिक जबाबदारी विकसित होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून प्रथमोपचाराबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.

 

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी हेल्थ अँड वेलनेस समितीच्या अध्यक्षा उज्वला नन्नवरे यांनी डॉ. जयश्री ललित महाजन यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग घेत विशेष प्रयत्न केले.

 

हेल्थ अँड वेलनेस समितीतर्फे आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, कृतीआधारित आणि जीवनोपयोगी ठरला.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘वीर गाथा 6.0’; छत्रपती शिवाजी...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): शहरातील रामेश्वर कॉलनी मेहरूण येथील रोजी आज श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय भारताच्या गौरवशाली इतिहासातील प्रेरणादायी वीरांच्या शौर्य व पराक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात आनंददायी शनिवारचा अनोखा उपक्रम चिमुकल्यांच्या...

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरूण शहरातील आज रोजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कल्पनाशक्तीला आणि हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

बैलापासून ट्रॅक्टरपर्यंत; बदलत्या शेतीसोबत पोळ्याचेही बदलते रूप संत ज्ञानेश्वर...

जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पोळा सणाचे औचित्य साधून आधुनिक शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, या उद्देशाने ट्रॅक्टर...

संपादक - रजत शेख

Latest