रावेर पोलिसांची कारवाई! शेतातील वीजतार चोरीप्रकरणी दोघांना अटक; २६ किलो तार जप्त

Spread the love

रावेर (प्रतिनिधी : सरिता महाजन)

रावेर तालुक्यातील भोर ते अजंदा रस्त्यालगत शेतशिवारातून वीजेच्या तारा चोरी केल्याप्रकरणी रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दोघांना अटक केली आहे. जुबेर रमजान तडवी आणि शरीफ राजू तडवी (दोघे रा. विवरे, ता. रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या मालापैकी २६ किलो अॅल्युमिनियम वीजतारेचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

५० हजारांच्या वीजतारा चोरीचा गुन्हा

रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १३६ प्रमाणे ६ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी राजेंद्र रामदास ठाकूर हे अग्रवाल पॉवर प्रा. लि. येथे साइट सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, भोर शिवारातील गट क्रमांक ८६१ जवळ, भोर ते अजंदा रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबावरील सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनियम वीजतारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या.

गुप्त माहितीवरून आरोपी जाळ्यात

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, घटना शेतशिवारात घडल्याने तपासासाठी ठोस माहिती मिळत नव्हती. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतातील मोटारपंप आणि वीजतारा चोरी करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत होती.

१४ ऑक्टोबर रोजी रात्री गस्तीवर असताना रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना अजंदा रस्त्यावर संशयित व्यक्ती फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन जुबेर रमजान तडवी आणि शरीफ राजू तडवी यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तार कापण्यासाठी वापरले जाणारे कटर व पक्कड आढळून आली.

भंगार दुकानातून २६ किलो तार जप्त

पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता त्यांनी वीजतारा चोरी करण्याच्या उद्देशाने त्या परिसरात आल्याची माहिती दिली. तसेच दोन ते तीन महिन्यांपूर्वी याच भोर ते अजंदा रस्त्यावरील वीजतारा चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. यातील जुबेर तडवी याचे विवरे गावात भंगार दुकान असून, त्याने चोरीच्या मालापैकी २६ किलो वीजतारेचे तुकडे काढून दिले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.

दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. या आरोपींकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिस पथकाची कामगिरी

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल बच्छाव, पोलिस हेडकॉन्स्टेबल नितीन आमोदकर, विजय चौधरी, समाधान ठाकूर तसेच पोलिस कर्मचारी विकार शेख, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, तुषार पाटील आणि रुबाब तडवी यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय चौधरी करीत आहेत.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest