जळगाव : फत्तेपुर पोलिसांची कारवाई; शेतातून कापूस चोरणाऱ्या तिघांना अटक, २.५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी :सरिता महाजन): दि. १२ ऑक्टोबर : जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील शेतातून कापूस चोरी करणाऱ्या तिघांना फत्तेपुर पोलिसांनी ताब्यात घेत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सैयद सोएब एजाज, सय्यद अनस महेमुद आणि शेख मोहम्मद रेहान अब्दुल कादर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ४० किलो कापूस आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी इको गाडी असा एकूण २ लाख ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

शेतातून कापूस चोरीला गेल्याची फिर्याद

 

शेंगोळा, ता. जामनेर येथील शेतकरी सदानंद कैलास जोशी (वय २५) यांच्या शेतातून ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री अंदाजे एक ते दीड क्विंटल कापूस चोरीला गेला होता. याप्रकरणी त्यांनी फत्तेपुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी १० ऑक्टोबर रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक २२४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

 

गुप्त माहितीच्या आधारे आरोपी ताब्यात

 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांनी विशेष पथक तयार केले.

 

तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहापूर, ता. जामनेर येथील सैयद सोएब एजाज (वय ३१), सय्यद अनस महेमुद (वय १९) आणि शेख मोहम्मद रेहान अब्दुल कादर (वय २७) या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीचा कापूस आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले.

 

२ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

या कारवाईत पोलिसांनी ४ हजार रुपये किमतीचा ४० किलो कापूस आणि २ लाख ५० हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी इको गाडी (क्रमांक MH 20 FY 2540) जप्त केली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ५४ हजार रुपये आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वात फत्तेपुर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची मोठी कारवाई; १५.३३ लाखांचा गुटखा जप्त

जळगाव (प्रतिनिधी: मसूद सय्यद): जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे....

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले टवेरा वाहन अमरावतीत सापडले; एक आरोपी...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: सतीश चव्हाण):शहरातील अक्सानगर परिसरातून चोरीला गेलेले ट टवेरा वाहन अमरावती शहरातील नवसारी परिसरातून शोधून काढण्यात मुक्ताईनगर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी...

अमळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातील दोन अट्टल घरफोड्यांना अटक...

जळगाव(प्रतिनिधी: आसमा शेख) : दि. १२ ऑक्टोबर : अमळनेर शहरात बंद घरांचे कुलूप तोडून घरफोड्या करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे....

संपादक - रजत शेख

Latest