अपघातग्रस्त वाहनातून गुटखा तस्करीचा पर्दाफाश निंभोरा पोलिसांची कारवाई; दोन आरोपी अटकेत, ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी: मुकेश कोळी):दि. ८ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात निंभोरा पोलिसांनी कारवाई केली. अपघातग्रस्त चारचाकी वाहनातून प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची वाहतूक होत असल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, वाहनासह एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

दि. ७ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५.४५ वाजता निंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील वडगाव फाट्याजवळ, ता. रावेर येथे एका चारचाकी वाहनाने सोनालिका कंपनीच्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच निंभोरा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली असता सिल्वर गोल्ड रंगाची हुंदाई कंपनीची आय-१० कार (क्र. MH-26-4-4423) असल्याचे आढळून आले. वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला असल्याचा संशय आल्याने वाहन चालकासह त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी निंभोरा पोलीस ठाण्यात आणले.

 

त्यानंतर पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गु.र.नं. २११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी अजीम तैय्यब सय्यद (वय २३, रा. गारखेडा परिसर, धरतीधन सोसायटी, इंदिरा नगर क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर) आणि शेख मुद्दस्सिर कासिम (वय २३, रा. इंदिरा नगर, गारखेडा, आलमगीर मशीदजवळ, छत्रपती संभाजीनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या अवैध गुटखा तस्करीमागील मुख्य सूत्रधाराचा तसेच या व्यवसायात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

 

जप्त मुद्देमाल

 

– प्रतिबंधित गुटखा व पानमसाला – ५ लाख ९० हजार ४४० रुपये

– हुंदाई आय-१० कार क्र. MH-26-4-4423 – १ लाख ८० हजार रुपये

– एकूण – ७ लाख ७० हजार ४४० रुपये

 

जप्त करण्यात आलेला गुटखा व पानमसाला कोठून आणण्यात आला होता, त्याचा पुरवठादार कोण आहे आणि या तस्करीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

 

पोलिसांची कामगिरी

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर, फैजपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

सहा. पोलीस निरीक्षक मीरा देशमुख, निंभोरा पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश सानप, किरण जाधव, महेंद्र महाजन, परेश सोनवणे, प्रशांत चौधरी, अमोल वाघ आणि सफराज तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

शेतातील मोटारपंप चोरीचा छडा; रावेर पोलिसांकडून चौघांना अटक चोरीची...

रावेर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): शेतातून चोरी जाणाऱ्या विद्युत मोटारपंप व कॉपर वायरच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या...

गुटखा-माव्याच्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा धडाका! जामखेड, कॅम्प...

अहिल्यानगर (प्रतिनिधी: अमीर शेख): जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. जामखेड, कॅम्प आणि कोतवाली...

संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून ‘पाठांतरातून प्रगती’; २५० विद्यार्थ्यांना...

जळगाव (प्रतिनिधी:सरिता महाजन): रामेश्वर कॉलनी येथील मेहरून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, आकलनशक्ती आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे...

संपादक - रजत शेख

Latest