सातारा तालुका पोलिसांचा गांजा तस्करांवर मोठा प्रहार! २४ किलो ९६० ग्रॅम गांजासह १६ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई; दोन मोबाईल आणि चारचाकी वाहन पोलिसांच्या ताब्यात

Spread the love

सातारा (प्रतिनिधी : मोसिन शेख ) : सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली असून, सातारा तालुका पोलिसांच्या डी.बी. पथकाने मोठी कारवाई करत तब्बल २४ किलो ९६० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत दोन मोबाईल आणि गांजा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे चारचाकी वाहन असा एकूण १६ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

 

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गांजा विक्री आणि तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकातील पोलीस हवालदार राजू शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सातारा गावाच्या हद्दीतून चारचाकी वाहनातून गांजाची विक्री करण्यासाठी दोन इसम येणार आहेत. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने सापळा रचला.

 

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी फॉरेन्सिक टीम, शासकीय पंच आणि वजनकाटा मापकारक यांचा समावेश असलेले विशेष पथक तयार केले.

 

शेंद्रे परिसरात वाहन अडवून झडती; गांजाचा मोठा साठा उघड

 

दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सातारा ते शेंद्रे मार्गावर शेंद्रे गावाच्या हद्दीत संशयित चारचाकी वाहन अडवून पोलिसांनी तपासणी केली. वाहनातील व्यक्तींची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये गांजाचा मोठा साठा आढळून आला.

 

या कारवाईत पोलिसांनी २४ किलो ९६० ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे ६ लाख २४ हजार रुपये), दोन मोबाईल (किंमत १४ हजार रुपये) आणि चारचाकी वाहन (किंमत अंदाजे १० लाख रुपये) असा एकूण १६ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव करीत आहेत.

 

कारवाईत पोलिसांचे विशेष पथक सहभागी

 

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

 

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अभिजित गुरव, पोलीस हवालदार मनोज गायकवाड, राजू शिंदे, दादा स्वामी, पंकज ढाणे, पोलीस संदीप पांडव, बीट अंमलदार सफी चंद्रकांत माने, पोलीस संदीप आवळे, सुनील भोसले तसेच फॉरेन्सिक पथकातील स्वप्नील आणि रुपाली मोरे यांनी सहभाग घेतला.

 

अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणाईला वाचविण्याची गरज!

 

गांजा आणि इतर अंमली पदार्थांची वाढती विक्री ही समाजासाठी चिंतेची बाब बनली आहे. विशेषतः तरुण पिढी अशा व्यसनांच्या आहारी जाऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याबरोबरच जनजागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

 

सातारा तालुका पोलिसांनी केलेली ही कारवाई अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधातील महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. अशा कारवाया सातत्याने सुरू राहिल्यास अंमली पदार्थ विक्रेत्यांवर निश्चितच कायद्याचा वचक निर्माण होईल.

 

अंमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांचा धडाका सुरूच; सातारा तालुका पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक!


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, चोरीच्या पाच...

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान): जळगाव शहरासह चोपडा, पिंपळा परिसर आणि इतर ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत...

जळगावच्या रथ चौकात पोलिसांची धडक कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल...

जळगाव (प्रतिनिधी : इमरान खान) : जळगाव शहरातील रथ चौक परिसरात अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला शनिपेठ पोलिसांनी धडक...

जळगाव शहर वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; १० लाख ९५...

जळगाव(प्रतिनिधी : राजू शेख) दि. १७ : जळगाव शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत अडावद येथील दोन तरुणांकडून तब्बल १०...

संपादक - रजत शेख

Latest