कानळदात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी पारंपरिक वेशभूषा आणि सामूहिक नृत्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन; सामाजिक एकतेचा दिला संदेश

Spread the love

कानळदा (प्रतिनिधी: इमरान खान): (ता. जळगाव) : येथील गावकऱ्यांच्या वतीने १५ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाचे महानायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. या निमित्ताने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

जयंती सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आदिवासी बांधवांनी परिधान केलेली पारंपरिक वेशभूषा आणि सादर केलेले सामूहिक नृत्य. महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. या उत्सवातून सामाजिक एकता, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

 

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

 

या प्रसंगी माजी सरपंच पुंडलिक सपकाळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, जळगाव वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, डॉ. बारेला, सुभाष बारेला, कुवरसिंग, कांतीलाल, सीताराम, प्रेमसिंग, थावर, तुफान यांच्यासह गावातील मान्यवर आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

एकता, संस्कृती आणि आदिवासी अस्मितेचा जागर करणारी भगवान बिरसा मुंडा जयंती कानळदावासीयांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

जळगावात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; दोन आरोपी अटकेत, चोरीच्या पाच...

जळगाव (प्रतिनिधी: इमरान खान): जळगाव शहरासह चोपडा, पिंपळा परिसर आणि इतर ठिकाणांहून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत...

जळगावच्या रथ चौकात पोलिसांची धडक कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल...

जळगाव (प्रतिनिधी : इमरान खान) : जळगाव शहरातील रथ चौक परिसरात अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला शनिपेठ पोलिसांनी धडक...

जळगाव शहर वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; १० लाख ९५...

जळगाव(प्रतिनिधी : राजू शेख) दि. १७ : जळगाव शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत अडावद येथील दोन तरुणांकडून तब्बल १०...

संपादक - रजत शेख

Latest