Home गुन्हे जळगाव स्थानिक गुन्हे शाखाची मोठी कारवाईदोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा १२ तासांत गजाआड

जळगाव स्थानिक गुन्हे शाखाची मोठी कारवाईदोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा १२ तासांत गजाआड

0
जळगाव स्थानिक गुन्हे शाखाची मोठी कारवाईदोन वाईन शॉप फोडणारा सराईत चोरटा १२ तासांत गजाआड

जळगाव (प्रतिनिधी) : दि. २० फेब्रुवारी रोजी जळगाव स्थानिक गुन्हे शाखाने अवघ्या १२ तासांत दोन वाईन शॉप फोडणाऱ्या सराईत चोरट्याला अटक करत मोठे यश संपादन केले. एकाच रात्रीत दोन दुकाने फोडल्याने शहरात खळबळ उडाली होती.

दोन ठिकाणी घरफोडी

दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भजे गल्ली येथील ‘प्रिन्स वाईन शॉप’चे शटर तोडून कपाटातील सुमारे २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली.

तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अजिंठा चौफुली जवळील ‘राज वाईन्स’ येथेही शटर तोडून सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची चोरी करण्यात आली होती.

याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३६/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १२४/२०२६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

आरोपी अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे रामनिवस मंजू गुप्ता (वय ३७, रा. रामनगर, कल्याण, जि. ठाणे) याला ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली बजाज अॅव्हेंजर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

आरोपीने दोन्ही चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून एकूण ३ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगार

सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये:

सानपाडा पोलीस स्टेशन

नेरुळ पोलीस स्टेशन

ठाणे शहर पोलीस स्टेशन

काशिमीरा पोलीस स्टेशन

नालासोपारा पोलीस स्टेशन

कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन

येथेही भादंवि व भा.न्या.सं.क. अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, उमाकांत पाटील, किशोर पाटील, पोलीस अंमलदार रविंद्र कापडणे, प्रशांत परदेशी तसेच नेत्रम विभागाचे पोलीस अंमलदार मुबारक देशमुख यांनी ही कारवाई यशस्वी केली.

पुढील तपास जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पो.उप.नि. गोपाल देशमुख तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोहेकॉ भगवान चौधरी करीत आहेत.