खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे यांची कारवाई; ६ कोटी ८६ लाख रूपये किंमतीचे ‘हेरॉईन’ जप्त

ठाणे (प्रतिनिधी ):दिनांक ०१/०२/२०२६ रोजी रात्री २२:०० वा चे सुमारास एक इसम हेरॉईन हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता गायमुख, घोडबंदर रोड, ठाणे पश्चिम जि.ठाणे येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी खंडणी विरोधी पथकाचे पोहवा/आशिष ठाकुर यांना मिळाली होती.

सदर बातमीचे अनुषंगाने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे सपोनि/तारमळे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करण्यात येवुन सदर पथकाने सापळा लावुन सुमारे २२:४५ वा गायमुख, घोडबंदर रोड, ठाणे प. येथे इसम नामे फरदीन गुलजार मुल्ला वय ५० वर्षे, काम रिक्षा चालक, रा.३०४, मुल्ला हाऊस, नवायत मोहल्ला, बाजारपेठ, सोपारागांव, नालासोपारा पश्चिम, ता. वसई, जि. पालघर यास शिताफीने ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यात एकूण २ किलो २८८ ग्रॅम वजनाचा (रूपये ६ कोटी ८६ लाख रूपये किंमतीचा) ‘हेरॉईन’ अंमलीपदार्थ मिळून आला. सदर इसमाविरूद्ध कासारवडवली पोलीस स्टेशन, ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक ९७/२०२६ एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५ कलम ८ (क), २१ (क) अन्वये नोंद करण्यात आला असून नमुद गुन्हयात त्यास अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी पोलीस कोठडीत असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनि /सुनिल तारमळे हे करीत आहेत.

  • सदरची उल्लेखनिय कामगिरी डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), विनय घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध – २, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, सपोनि /सुनिल तारमळे, सपोउनि/संदिप भोसले, पोहवा /आशिष ठाकुर, पोहवा /अभिजीत गायकवाड, पोना/सुमित मधाळे, पोहवा/भगवान हिवरे, यानी केली आहे.

आपले शब्द न्यूज, संपादक : रजत शेख

RECENT NEWS