जळगावात सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ! गुलाबी गँग सखीच्या संचालिकेचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक; डेटा गायबमहिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर घडला प्रकार; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: मुकेश कोळी): दि. ११ ऑक्टोबर : जळगाव शहरात सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, गुलाबी गँग सखीच्या संचालिका वैशाली रोहिदास झाल्टे यांचे इन्स्टाग्राम अकाउंट अज्ञात व्यक्तीने लॉक केल्याचा आणि त्यावरील डेटा गायब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा प्रकार घडल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ४३ आणि ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ केला होता शेअर

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली झाल्टे यांनी ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जळगावातील शिव कॉलनीजवळील संजीवनी हॉस्पिटल परिसरात वाहतूक सिग्नलवर गर्दी असताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मोबाईल वापरण्याचा व्हिडिओ तयार केला होता. त्यानंतर या घटनेच्या अनुषंगाने वाहतूक कार्यालयात झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला.

 

इन्स्टाग्रामवरील टिप्पणी; दुसऱ्याच दिवशी अकाउंट लॉक

 

या व्हिडिओवर ‘YD-yashu09’ या इन्स्टाग्राम खात्यावरून आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. त्यानंतर वैशाली झाल्टे यांनी संबंधित खात्याच्या मेसेंजरवर उत्तर देत आपली बाजू मांडली. मात्र, या संवादानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१७ वाजता त्यांच्या मोबाईलवर इन्स्टाग्राम अकाउंट सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉक केल्याचा संदेश आला.

 

काही ओळखीच्या व्यक्तींनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावरून ब्लॉक केल्याबाबत विचारणा केल्यानंतर आपले अकाउंट बंद झाल्याचे आणि त्यावरील डेटा गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे आपले सोशल मीडिया खाते अनधिकृतपणे बंद करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

 

जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

 

या प्रकरणी वैशाली झाल्टे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ११ ऑक्टोबर रोजी पहाटे २.५५ वाजता अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शरद उत्तमराव शेवाळे यांच्या नोंदीखाली या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

अमळनेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातील दोन अट्टल घरफोड्यांना अटक...

जळगाव(प्रतिनिधी: आसमा शेख) : दि. १२ ऑक्टोबर : अमळनेर शहरात बंद घरांचे कुलूप तोडून घरफोड्या करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे....

जळगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी करणारा सराईत चोरटा...

जळगाव (प्रतिनिधी: राजू शेख) :जळगाव शहरातील निसार कॉलनी परिसरात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत छडा लावला. या प्रकरणी असमतखा इलियास...

अपघातग्रस्त वाहनातून गुटखा तस्करीचा पर्दाफाश निंभोरा पोलिसांची कारवाई; दोन...

जळगाव(प्रतिनिधी: मुकेश कोळी):दि. ८ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात निंभोरा पोलिसांनी कारवाई केली....

संपादक - रजत शेख

Latest