गुटखा-माव्याच्या अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा धडाका! जामखेड, कॅम्प व कोतवाली हद्दीत चार ठिकाणी छापे; ४ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

अहिल्यानगर (प्रतिनिधी: अमीर शेख): जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गुटखा, मावा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. जामखेड, कॅम्प आणि कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून तब्बल ४ लाख ७२ हजार १२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर काही आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दोन पथके तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या.

या पथकांमध्ये पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, राहुल डोके, रोहित मिसाळ, शाहीद शेख, भगवान सानप, संदीप पवार, संतोष खैरे, विकास साळवे आणि रणजीत जाधव यांचा समावेश होता.

 

जामखेडमध्ये दोन ठिकाणी कारवाई

 

दि. ६ व ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. पहिल्या कारवाईत अर्जुन गहिनीनाथ सोनटक्के, रा. भवरवाडी, ता. जामखेड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून २८ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

दुसऱ्या कारवाईत श्वेत शिवाजी वीर, रा. पोकळेवस्ती, जामखेड याच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात आशुतोष शामराव रहाणे, रा. शिर्डी आणि किरण बोराडे, रा. पाथरूड, ता. भूम, जि. धाराशिव यांचा सहभाग असल्याचे समोर आले. या कारवाईत १ लाख १३ हजार १७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आशुतोष रहाणे व किरण बोराडे हे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

कॅम्प हद्दीत ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतही स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत सचिन सुखदेव हराळे (वय ३६), रा. नागरदेवळे, ता. अहिल्यानगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यासोबत समीर शरीफ शेख, रा. शाहूनगर, केडगाव याचा सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले असून तो फरार आहे.

 

या कारवाईत पोलिसांनी ६३ हजार ७०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

कोतवाली हद्दीत सर्वाधिक कारवाई

 

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या कारवाईत सर्वाधिक २ लाख ६६ हजार ९०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

या प्रकरणात दिपक शिवाजी वांढेकर, रा. सालेवडगाव, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. झेंडा चौक, केडगाव, अहिल्यानगर आणि समीर शरीफ शेख, रा. शाहूनगर, केडगाव यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच नितीन वैजीनाथ शिंदे, रा. निपाणी, जि. धाराशिव आणि सोहेल शेख, रा. टिळकरोड, अहिल्यानगर हे फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

 

चार गुन्हे दाखल; कारवाईचा धडाका कायम

 

या चारही कारवायांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच लागू प्रकरणांमध्ये कलम ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

चारही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ७२ हजार १२९ रुपये आहे. गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या सलग कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तसेच पोलीस अंमलदार अभिजीत अरकल, राहुल डोके, रोहित मिसाळ, शाहीद शेख, भगवान सानप, संदीप पवार, संतोष खैरे, विकास साळवे आणि रणजीत जाधव यांच्या पथकाने केली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

शेतातील मोटारपंप चोरीचा छडा; रावेर पोलिसांकडून चौघांना अटक चोरीची...

रावेर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): शेतातून चोरी जाणाऱ्या विद्युत मोटारपंप व कॉपर वायरच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या...

संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून ‘पाठांतरातून प्रगती’; २५० विद्यार्थ्यांना...

जळगाव (प्रतिनिधी:सरिता महाजन): रामेश्वर कॉलनी येथील मेहरून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता, आकलनशक्ती आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे...

मुक्ताईनगर पोलिसांची गुटखा तस्करीविरोधात धडक कारवाई; १९.१३ लाखांचा मुद्देमाल...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: अमृत सपकाळे):महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुक्ताईनगर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत एका...

संपादक - रजत शेख

Latest