जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) :

जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला आणि नागरिक थिरकत असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
या उत्सवाचे आयोजन अल्पेश भाऊ देवरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. दांडिया उत्सवाच्या आनंदासोबतच भाविकांसाठी उद्या, महाजन नगर येथील ओपन पेजवर खाटू श्याम बाबा दरबाराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भाविकांना खाटू श्याम बाबांच्या भक्तीत तल्लीन होण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनात संजय देवरे, योगेश बनछोडे, राजेश बनछोडे, पवन राजपूत, लोकेश जंजाळकर, विवेक मराठे, दीपक राजपूत, सागर देवरे, मोंटी राजपूत, रोहित चौधरी आणि कल्पेश सोनार यांच्यासह अन्य सहकारी योगदान देत आहेत.
दांडियाचा उत्साह आणि खाटू श्याम बाबांच्या भक्तीचा संगम अनुभवण्यासाठी महाजन नगर तसेच परिसरातील सर्व भाविकांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक अल्पेश भाऊ देवरे यांनी केले आहे.








