८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहर वाहतूक शाखेचा वृक्षारोपण व झिरो फेटॅलिटी जनजागृती उपक्रम संपन्न

Spread the love

जळगाव, दि. १५ ऑगस्ट २०२६ (प्रतिनिधी: इमरान खान) : ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जळगाव शहर वाहतूक शाखेच्या वतीने वृक्षारोपण, अपघातग्रस्तांना तातडीची मदत तसेच ‘झिरो फेटॅलिटी’ जनजागृती प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ध्वजारोहणानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव विभाग) नितीन गणापुरे तसेच परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सह्याद्री मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे व शाखेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

यावेळी शहर वाहतूक कार्यालयाच्या परिसरात, नागरी हक्क कक्ष व सायबर पोलीस स्टेशन परिसरात पिंपळ, वड, बेल, सिसम, जांभूळ व लिंब आदी विविध प्रजातींची एकूण ६० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धन व जागतिक तापमानवाढीच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

 

तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्ते अपघातातील मृत्यूदर शून्यावर आणण्याच्या उद्देशाने इच्छादेवी चौक येथे ‘झिरो फेटॅलिटी’ प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. अपघात घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे, संबंधित वाहन व चालकाला ताब्यात घेणे आणि वाहतूक सुरळीत करणे याबाबतचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक नागरिकांना दाखविण्यात आले.

 

यावेळी नागरिकांना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच वाहतूक नियमांचे पालन करून अपघातमुक्त शहर उभारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले.

 

दरम्यान, इच्छादेवी चौक रिक्षा स्टँड येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ५० हून अधिक रिक्षाचालकांना वाहन चालविताना आवश्यक कागदपत्रे, परवाना, विमा, बिल्ला आदींचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच अपघात घडल्यास विमा व न्यायाधिकरणामार्फत मिळणाऱ्या लाभांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest