मला तुकाराम मुंडे व्हायचं नाही, त्यांच्यासारखं कर्तव्यनिष्ठ व्हायचंय!’; संत ज्ञानेश्वर विद्यालयाची अनोखी तिरंगा रॅली

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे देशभक्ती आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडवणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यालयात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज तसेच कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांचे छायाचित्र आणि संदेशफलक घेऊन सहभाग नोंदविला. “मला तुकाराम मुंडे व्हायचं नाही, त्यांच्यासारखं कर्तव्यनिष्ठ व्हायचंय!” असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

 

रॅलीदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा साकारत देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्वही अधोरेखित केले.

 

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे सादर केली. तसेच संगीत, कवायती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व देशप्रेमाला मिळालेल्या व्यासपीठामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल कोळी यांनी केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन मराठे, सचिव जितेंद्रलाल, दिलीप डिंगरे, रवी कटारिया, प्रयोग बेहडे, अरविंद पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन जेठवाणी, जयदीप सर, भागवत सानप, एकनाथ वंजारी, अर्चना नाईक, डॉ. कोमल पाटील यांच्यासह शाळेच्या विविध समित्यांचे पदाधिकारी, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांच्या या अनोख्या तिरंगा रॅलीने स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अधिक वृद्धिंगत करत समाजापर्यंत प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने कार्य करण्याचा सकारात्मक संदेश पोहोचविला. उपस्थित मान्यवरांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest