जळगावात कथित तोतया पत्रकारांचा वावर; चौकशी व कारवाईची मागणी

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी : इमरान खान):जळगाव शहरासह जिल्ह्यात स्वतःला पत्रकार म्हणून सादर करणाऱ्या काही व्यक्तींच्या हालचालींमुळे प्रशासन, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित व्यक्तींकडे अधिकृत मान्यता अथवा आवश्यक नोंदणी नसतानाही पत्रकारितेचा धाक दाखवून विविध ठिकाणी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

 

स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार भेटी देत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांशी पत्रकार असल्याचे सांगून संपर्क साधत आहेत. ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वनविभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांमध्ये या प्रकाराबाबत नाराजी असल्याचे बोलले जात आहे.

 

याशिवाय व्यापारी, उद्योजक, पेट्रोल पंप चालक, हॉटेल व ढाबा व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिक घटकांनाही कथितरित्या ओळखपत्रांचा आधार घेत दबाव आणला जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या प्रकारामुळे प्रामाणिक आणि अधिकृत पत्रकारांच्या प्रतिमेवरही परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी अशा प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींकडे आवश्यक नोंदणी, मान्यता आणि वैध ओळखपत्र आहेत की नाही, याची पडताळणी करून नियमबाह्य प्रकार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

 

दरम्यान, या संदर्भातील आरोपांची संबंधित यंत्रणांकडून अधिकृत पुष्टी झालेली नसून, नागरिकांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest