जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम; ८२ गुन्हे दाखल, २४.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

जळगाव( प्रतिनिधी: इमरान खान):जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत हातभट्टी व गावठी दारू निर्मिती-विक्री, पानटपऱ्यांवरील कायद्याचे उल्लंघन तसेच संशयित भंगार व्यवसायांवर कारवाई करण्यात आली. मोहिमेदरम्यान विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत लक्षणीय यश मिळविले.

हातभट्टी व गावठी दारूविरोधातील मोहिमेत दारूबंदी कायद्यान्वये एकूण ८२ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत २२ हजार २३ लिटर गावठी दारू, रसायने आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त व नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २४ लाख १३ हजार ७३० रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, जिल्हाभरातील पानटपऱ्यांची तपासणी करून COPTA कायद्यान्वये १७७ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३१ पानटपऱ्या निष्कासित करण्यात आल्या.

याशिवाय चोरीच्या मालाच्या खरेदी-विक्रीस आळा घालण्यासाठी भंगार दुकानांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत ११३ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ७ दुकानांमध्ये संशयास्पद माल आढळून आल्याने मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये कारवाई करण्यात आली.

 

 

ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

 

जिल्ह्यात अवैध हातभट्टी, गावठी दारू निर्मिती-विक्री, पानटपऱ्यांवरील कायद्याचे उल्लंघन आणि चोरीच्या मालाच्या व्यवहारांना प्रतिबंध करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अशा अवैध व्यवसायांची माहिती निर्भयपणे जवळच्या पोलीस ठाण्यास देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest