शैक्षणिक साहित्य निर्मितीतून अध्यापन अधिक प्रभावी श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील शिक्षिका शारदा तडवी यांचा अभिनव उपक्रम

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन) : विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आनंददायी, सोपे आणि कृतीप्रधान व्हावे या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथील क्रीडा शिक्षिका सौ. शारदा तडवी यांनी विविध विषयांसाठी आकर्षक व उपयुक्त टी.एल.एम. (Teaching Learning Material) तयार करून एक अभिनव उपक्रम राबविला आहे.

 

तयार करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्यामध्ये पृथ्वीची गती, दिवस-रात्र, नकाशे, भूगोल तसेच विज्ञान विषयांशी संबंधित विविध त्रिमितीय (3D) मॉडेल्सचा समावेश आहे. या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थी प्रत्यक्ष कृती करत संकल्पना समजून घेत असल्याने त्यांच्या अध्ययन प्रक्रियेत अधिक उत्साह निर्माण होत आहे. तसेच विद्यार्थ्यांची जिज्ञासा, निरीक्षण क्षमता आणि सहभाग वाढण्यासही मदत होत आहे.

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) तसेच कृतीआधारित शिक्षणाच्या संकल्पनेला अनुसरून तयार करण्यात आलेले हे टी.एल.एम. अध्यापन अधिक प्रभावी बनविणारे ठरत आहे. अवघड संकल्पना सहज आणि सुलभ पद्धतीने समजून घेण्यास विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होत आहे.

 

याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांनी सौ. शारदा तडवी यांच्या सर्जनशील कार्याचे कौतुक केले. अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य निर्मितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवड निर्माण होत असून शिक्षण अधिक परिणामकारक बनत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालयातील शिक्षकांनीही या उपक्रमाचे स्वागत करून त्याचे अभिनंदन केले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest