जळगावात ३ दिवस वाहतुकीत मोठा बदल; रेल्वे ब्रिज दुरुस्तीमुळे ६ पर्यायी मार्ग जाहीर

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी ): अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रेल्वे पुलांच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरता बदल केला असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई-नागपूर बायपास महामार्गावरील भुसावळ-आसोदा रेल्वे पुलावरील रस्ता तसेच पाळधी-भुसावळ मार्गावरील सुरत रेल्वे पुलावरील रस्ता ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून हे काम पुढील चार ते पाच दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ (१)(ब) अंतर्गत अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार तरसोद फाटा ते पाळधी गाव दरम्यानच्या बायपास मार्गावरील वाहतुकीत १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

शहर वाहतूक शाखा व जिल्हा पोलिस प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी आवश्यक बंदोबस्त तैनात केला असून वाहनचालकांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहीर करण्यात आलेले पर्यायी मार्ग

१) भुसावळ/नागपूरकडून धुळे/मुंबईकडे जाणारी वाहने :

तरसोद फाटा – कालिका माता मंदिर – अजिंठा चौफुली – आकाशवाणी चौक – शिव कॉलनी – बांभोरी पूल – पाळधी मार्गे.

२) मुंबई/धुळेहून भुसावळ/नागपूरकडे जाणारी वाहने :

पाळधी – बांभोरी – शिव कॉलनी – आकाशवाणी चौक – अजिंठा चौफुली – कालिका माता मंदिर – तरसोद फाटा मार्गे.

३) छत्रपती संभाजीनगरहून नागपूरकडे जाणारी वाहने :

पहूर – जामनेर – नाहाटा चौफुली – भुसावळ मार्गे.

४) नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने :

भुसावळ – नाहाटा चौफुली – जामनेर – पहूर मार्गे.

५) इंदौर/बडोदा/नंदुरबारहून भुसावळ/नागपूरकडे जाणारी वाहने :

चोपडा – अडावद – यावल – भुसावळ मार्गे.

६) नागपूर/भुसावळहून नंदुरबार/बडोदा/इंदौरकडे जाणारी वाहने :

भुसावळ – यावल – अडावद – चोपडा मार्गे.

पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम (शहर वाहतूक शाखा, जळगाव) यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून सुरक्षित वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest