गुरुपौर्णिमेला हरित गुरुदक्षिणा; विद्यार्थिनींकडून पर्यावरणप्रेमी मुख्याध्यापकांना इनडोअर वृक्ष भेट

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी) : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत विद्यालयाचे पर्यावरणप्रेमी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांना आकर्षक इनडोअर वृक्ष भेट देऊन आगळीवेगळी गुरुदक्षिणा अर्पण केली. पारंपरिक भेटवस्तूंऐवजी हिरवाईची भेट देत विद्यार्थिनींनी “वृक्ष हीच खरी गुरुदक्षिणा” हा संदेश समाजासमोर प्रभावीपणे मांडला.

 

हा उपक्रम उपशिक्षिका स्वाती नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. त्यांनी विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमेचे महत्त्व तसेच पर्यावरण संवर्धनाची गरज समजावून सांगत हरित गुरुदक्षिणेची संकल्पना प्रत्यक्षात आणली.

 

विद्यालयात सातत्याने राबविण्यात येणारे ‘एक विद्यार्थी – एक वृक्ष’, ‘वृक्ष बँक’, बीज संकलन, वृक्षारोपण यांसारखे विविध हरित उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजवत आहेत. याच उपक्रमांच्या प्रेरणेतून विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हा अभिनव उपक्रम साकारला.

 

यावेळी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करत सांगितले की, “ही भेट केवळ एक रोप नसून विद्यार्थिनींच्या प्रेमाची, आदराची आणि पर्यावरणाविषयीच्या जागरूकतेची जिवंत आठवण आहे. अशा हरित गुरुदक्षिणेमुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल.”

 

या उपक्रमामुळे गुरुपौर्णिमा उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची अर्थपूर्ण जोड मिळाली. उपस्थित शिक्षक व पालकांनी विद्यार्थिनींच्या या अभिनव उपक्रमाचे उत्स्फूर्त कौतुक केले. “एक वृक्ष म्हणजे एक जीवन” हा संदेश कृतीतून देत इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी गुरुपौर्णिमा साजरी करण्याची प्रेरणादायी आणि पर्यावरणपूरक परंपरा जपली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest