जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी फुलवली औषधी वनस्पतींची परसबाग

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी): जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथील इको क्लबच्या वतीने इयत्ता चौथीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शाळेच्या परसबागेत विविध औषधी वनस्पतींची लागवड केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत अनुभवाधारित व कृतीआधारित शिक्षणाला चालना देणारा हा उपक्रम उपशिक्षिका कल्याणी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.

उपक्रमात विद्यार्थ्यांनी तुळस, कोरफड, गुळवेल, कडुनिंब, गवती चहा, अडुळसा, पुदिना आणि हळद आदी औषधी वनस्पतींची लागवड केली. प्रत्येक वनस्पतीचे औषधी गुणधर्म, आरोग्यदायी उपयोग, पर्यावरणातील योगदान आणि संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावून सांगण्यात आले. लागवडीनंतर रोपांचे संगोपन, पाणी देणे, स्वच्छता राखणे आणि वाढीची नियमित नोंद ठेवण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वीकारली.

 

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, जैवविविधतेबद्दल आदर आणि भारतीय आयुर्वेद परंपरेविषयी जागरूकता निर्माण झाली. शाळेतील औषधी परसबाग भविष्यात विज्ञान, पर्यावरण आणि आरोग्यविषयक अभ्यास, निरीक्षण तसेच अनुभवाधारित शिक्षणासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

यावेळी मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक, पर्यवेक्षिका शितल कोळी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. “निसर्ग संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक रोप लावून त्याचे संगोपन करावे,” असा संदेश उपस्थितांनी दिला. शाळेत पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी सवयी आणि शाश्वत विकासाची मूल्ये रुजविण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest