स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात अभिवादन; विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचारांचा संदेश

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहिताच्या कार्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या कार्यातून प्रामाणिकपणा, समाजसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचे मूल्य आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले.

विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. शितल कोळी यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजहिताची जाणीव ठेवावी, असे सांगितले. मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांनी जीवनात यश मिळवण्यासाठी मेहनत, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जोपासणे आवश्यक असल्याचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्यालयातील शिक्षकांनी केले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest