विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयात विविध क्लबांची स्थापना

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी संस्थाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांच्या संकल्पनेतून श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विविध शालेय क्लबांची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव, सर्जनशीलता तसेच आरोग्यदायी जीवनशैली विकसित करणे हा आहे.

 

या उपक्रमांतर्गत हेल्थ अँड वेलनेस क्लब, विज्ञान क्लब, पर्यावरण क्लब, वाचन क्लब, क्रीडा क्लब तसेच कला व सांस्कृतिक क्लब यांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक क्लबसाठी शिक्षक, पालक प्रतिनिधी आणि विद्यार्थी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. या क्लबांच्या माध्यमातून वर्षभर विविध स्पर्धा, कार्यशाळा, प्रात्यक्षिके, जनजागृती मोहिमा आणि कौशल्यविकास उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

 

हेल्थ अँड वेलनेस क्लबमार्फत आरोग्य तपासणी, पोषणविषयक जनजागृती, योग, मानसिक आरोग्य, प्रथमोपचार आणि स्वच्छतेसंदर्भातील उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. तर विज्ञान क्लबच्या माध्यमातून विज्ञान प्रयोग, विज्ञान प्रदर्शने, प्रकल्प स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

 

यावेळी संस्थाध्यक्ष प्रशांत सुरेश नाईक यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचा विकास केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न राहता त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळणे आवश्यक आहे. विविध क्लबांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, जबाबदारी, संघभावना आणि आत्मविश्वास विकसित होईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांना पूरक असा हा उपक्रम आहे.”

 

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी क्लब प्रमुख, शिक्षक आणि विद्यार्थी प्रतिनिधींना वर्षभर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. विद्यालयाच्या या अभिनव उपक्रमाचे पालकांनी स्वागत केले असून परिसरातूनही त्याचे कौतुक हो

त आहे.

 


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest