मेहरुणमध्ये एस.आय.आर. अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत १० शिबिरांचे आयोजन

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी: सरिता महाजन): मेहरुण परिसरात सुरू असलेल्या एस.आय.आर. (S.I.R.) अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २९ जूनपासून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत आतापर्यंत १० शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून, शेकडो नागरिकांनी सहभागी होत मतदार यादीसंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.शि

बिरांमध्ये मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, माहिती अद्ययावत करणे, अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच विविध शंकांचे निरसन याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत अभियानाचा लाभ पोहोचावा यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरांत जाऊन फॉर्मचे वितरण करत जनजागृतीही केली.

सध्या संत ज्ञानेश्वर चौक येथे, माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांच्या निवासस्थानाजवळ एस.आय.आर. शिबिर सुरू असून, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत मतदार यादीशी संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

“आजच या आणि आपले काम वेळेत पूर्ण करा. आपला एक छोटासा प्रयत्न उद्याची मोठी अडचण टाळू शकतो,” असा संदेशही अभियानादरम्यान देण्यात येत आहे.

नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता एस.आय.आर. अभियान पुढील काळातही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून, अधिकाधिक पात्र नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest