झिरो फेटॅलिटी मोहिमेत जळगाव शहर वाहतूक शाखेची धडक कारवाई; 191 वाहनचालकांवर कारवाई, 1.67 लाखांचे चलन

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी : सरिता महाजन):दि. 17 जुलै : जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे आज (17 जुलै) “झिरो फेटॅलिटी” मोहिमेअंतर्गत विशेष वाहतूक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण 191 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून 1 लाख 67 हजार 250 रुपयांचे ई-चलन करण्यात आले. त्यापैकी 3 हजार रुपये रोख दंड जागीच वसूल करण्यात आला.

या कारवाईत विनाहेल्मेट 61, विनापरवाना (लायसन्स) 56, अल्पवयीन चालक 3, अवैध प्रवासी वाहतूक 1, तीन प्रवासी (थ्री सीट) 4, मद्यप्राशन करून वाहन चालविणारा 1, विनासीट बेल्ट 6 तसेच इतर 63 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.

ही मोहीम जळगाव शहरातील बसस्थानक, कालिका माता मंदिर परिसर तसेच मानराज पार्क परिसरात राबविण्यात आली. सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत विशेष नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली.

 

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून अपघातमुक्त शहर घडविण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, शहर वाहतूक शाखा, जळगाव यांनी दिली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest