रामेश्वर कॉलनीत मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची नागरिकांची मागणी

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन) : वार्ड क्रमांक १९ मधील रामेश्वर कॉलनी परिसरात मुलींसाठी मोफत स्वसंरक्षण (सेल्फ डिफेन्स) प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात यावे तसेच कायमस्वरूपी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की, रामेश्वर कॉलनी परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व तरुणी वास्तव्यास असून त्यांच्या सुरक्षिततेसह आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत मुलींना कराटे, सेल्फ डिफेन्सची तंत्रे, आपत्कालीन प्रसंगी स्वतःचे संरक्षण, महिलांचे कायदेशीर हक्क तसेच महिला सुरक्षा विषयक मार्गदर्शन देणारे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

यासोबतच केवळ एकदाच शिबिर न भरविता रामेश्वर कॉलनी परिसरात मुलींसाठी कायमस्वरूपी स्वसंरक्षण प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, जेणेकरून परिसरातील मुली व विद्यार्थिनी नियमितपणे प्रशिक्षण घेऊन आत्मविश्वासाने व सुरक्षितपणे जीवन जगू शकतील, अशी मागणीही करण्यात आली आहे.

 

या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करावे तसेच कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती नागरिकांनी केली आहे.

 

हे निवेदन हर्षल वाणी, संदीप मांडोळे, गणेश पाटील आणि अविनाश पाटील यांनी दिले आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest