संस्थापकांच्या विचारांचा जागर; ‘स्व. सुरेश मामा नाईक सभागृह’ नामकरणाने कृतज्ञतेचा भाव

Spread the love

मेहरुण (प्रतिनिधी) : संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक स्व. सुरेश मामा नाईक यांच्या १३ व्या पुण्यस्मरणानिमित्त विद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या सभागृहाला “स्व. सुरेश मामा नाईक सभागृह” असे नामकरण करून संस्थापकांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात स्व. सुरेश मामा नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहिली. विद्यार्थ्यांनी “संस्थापकांचे स्वप्न – संस्कार, शिक्षण आणि समाजसेवा; हाच आमचा संकल्प” अशी प्रतिज्ञा घेत त्यांच्या विचारांशी निष्ठा व्यक्त केली.

 

यावेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी “एक विद्यार्थी – एक कौशल्य” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान आणि शैक्षणिक साहित्य वाटप यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांद्वारे संस्थापकांना अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 

कार्यक्रमात बोलताना संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक म्हणाले, “स्व. सुरेश मामा नाईक यांनी शिक्षण हीच खरी समाजसेवा मानून या संस्थेची भक्कम पायाभरणी केली. त्यांचे स्वप्न केवळ शाळा उभारण्याचे नव्हते, तर सुसंस्कारित, सुशिक्षित आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे होते. सभागृहाला त्यांचे नाव देणे ही त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.”

 

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी संस्थापकांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी त्यांचे आदर्श आचरणात आणावेत, असे आवाहन केले.

 

या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृतज्ञता, आदर आणि प्रेरणेच्या भावनेने भारावलेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

माता-पालकांचा ‘एक तास’ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी; माता-पालक मेळाव्यात घेतला...

मेहरुण(प्रतिनिधी: सरिता महाजन): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी द्वितीय माता-पालक शैक्षणिक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात...

पी. एल. शिरसाठ ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजूभाई जावरे...

जळगाव( प्रतिनिधी: सतीश दहीकर):जळगाव : पी. एल. शिरसाठ ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजूभाई जावरे यांचा जळगाव जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला असून, या दौऱ्यादरम्यान...

‘कामाला लिंग नसते’; दप्तरमुक्त शनिवारी मुलांनी-मुलींनी अनुभवली घरकामाची शाळा

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन घरकामांचा प्रत्यक्ष अनुभव देणारा...

संपादक - रजत शेख

Latest