जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘एक विद्यार्थी – एक कौशल्य’ उपक्रमातून आधुनिक शेतीची ओळख

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी): रामेश्वर कॉलनी येथील रोजी मेहरून जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे “एक विद्यार्थी – एक कौशल्य” या उपक्रमांतर्गत “पाईप शेती – कमी जागेत आधुनिक शेती” या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देत विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाची आवड निर्माण करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

 

या उपक्रमात पीव्हीसी (PVC) पाईपच्या साहाय्याने कमी जागेत भाजीपाला व औषधी वनस्पतींची लागवड कशी करता येते, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. पाईपमध्ये माती, सेंद्रिय खत व बियाण्यांचा योग्य वापर, पाणी व्यवस्थापन, रोपांची निगा आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 

साधना शिरसाट मॅडम यांनी पाईप शेतीची संकल्पना, तिचे फायदे, कमी जागेत अधिक उत्पादन घेण्याच्या पद्धती तसेच आधुनिक शेतीतील नव्या तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दिली. विद्यार्थ्यांनी स्वतः लागवड करून आधुनिक शेतीचे कौशल्य आत्मसात केले.

 

‘एक विद्यार्थी – एक कौशल्य’ या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक जीवनोपयोगी कौशल्य विकसित करावे, या उद्देशाने शाळेत सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पाईप शेतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड, श्रमप्रतिष्ठा, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

 

मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबांचा...

जळगाव (प्रतिनिधी : सरिता महाजन) : जळगाव शहरातील महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दांडियाच्या तालावर तरुणाईसह महिला...

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून आंध्र प्रदेशातील...

मुक्ताईनगर (प्रतिनिधी: मुकेश कोळी): मुक्ताईनगर शहरातील एस. एस. कॉलेज परिसरात दरोड्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी आंध्र प्रदेशातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या...

भुसावळ सराफ बाजारातील ३ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल...

जळगाव (प्रतिनिधी: सतीश राठोड):  भुसावळ येथील सराफ बाजारातील बन्सीलाल अग्रवाल ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याचे मंगळसूत्र आणि पेंडल चोरी करणाऱ्या महिलेला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

संपादक - रजत शेख

Latest