श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाला भारत विकास परिषदेकडून सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन भेट

Spread the love

मेहरूण (प्रतिनिधी: सरित महाजन): विद्यार्थिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत विकास परिषद, जळगाव शाखेच्या वतीने मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाला सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन सप्रेम भेट देण्यात आले.

 

विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थिनींना गरजेच्या वेळी शाळेतच सॅनिटरी नॅपकिन सहज उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांनी भारत विकास परिषदेकडे विनंती केली होती. त्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत परिषदेने विद्यालयाला व्हेंडिंग मशीन उपलब्ध करून दिले.

 

कार्यक्रमाला भारत विकास परिषद, जळगाव शाखेचे अध्यक्ष अनिरुद्ध कोटस्थाने, सचिव भूषण गुरव, प्रांत सेवा गतिविधी प्रमुख डॉ. सुरेश अग्रवाल, ज्ञानेश्वर पाटील, गायत्री कुलकर्णी, कविता कोटस्थाने, डॉ. विकास चौधरी, जयेश वाल्हे, विशाल चोरडिया, डॉ. योगेश पाटील आणि विद्याधर केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी श्रीमती शितल कोळी, साधना शिरसाट, सरला पाटील, रूपाली आव्हाड, सोनाली चौधरी, कल्याणी महाजन, शारदा तडवी यांच्यासह शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या व्हेंडिंग मशीनमुळे विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात कोणताही संकोच न बाळगता आवश्यक सुविधा शाळेतच उपलब्ध होणार असून त्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाला बळ मिळणार आहे. विद्यार्थिनींसाठी आरोग्यदायी व सुरक्षित शालेय वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाच्या वतीने भारत विकास परिषद, जळगाव शाखेचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. समाजोपयोगी कार्यातून शिक्षण क्षेत्राला दिलेल्या या सहकार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


Spread the love

या बातम्या देखील वाचा

माता-पालकांचा ‘एक तास’ विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी; माता-पालक मेळाव्यात घेतला...

मेहरुण(प्रतिनिधी: सरिता महाजन): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी द्वितीय माता-पालक शैक्षणिक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात...

पी. एल. शिरसाठ ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजूभाई जावरे...

जळगाव( प्रतिनिधी: सतीश दहीकर):जळगाव : पी. एल. शिरसाठ ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजूभाई जावरे यांचा जळगाव जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला असून, या दौऱ्यादरम्यान...

‘कामाला लिंग नसते’; दप्तरमुक्त शनिवारी मुलांनी-मुलींनी अनुभवली घरकामाची शाळा

जळगाव (प्रतिनिधी: सरिता महाजन): श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन घरकामांचा प्रत्यक्ष अनुभव देणारा...

संपादक - रजत शेख

Latest